Saturday 15 December 2012

महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत संत ज्ञानेश्वर यांचे आळंदी हे समाधिस्थान आहे. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनातील काही काळ येथे व्यतीत केला. या आळंदी गावाला "देवाची आळंदी" असे म्हणतात, कारण चोराची आळंदी नावाचे आणखे एक गाव पुणे जिल्ह्यात आहे. ही देवाची पुण्यापासून अवघ्या पंचवीस किलोमीटरवर आहे. वारकरी लोकांसाठी तसेच समस्त मराठी जनांसाठी आळंदीला मोठे महत्त्व आहे.
आळंदी घाट

आळंदी हे शहर इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले आहे. संत ज्ञानेश्वर समाधी मंदिराच्या मागच्या बाजूला नदीवर असलेला घाट अतिशय सुंदर आहे. (चित्र पाहा.)
ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी येथे १२१८ साली जिवंत समाधी घेतली. त्या जागी एक सुंदर समाधिमंदिर १५७०(की १५४०?) मध्ये बांधण्यात आले असे सांगितले जाते.
आषाढ महिन्यातील एकादशीला आळंदीहून निघून पंढरपूरला ज्ञानेश्वरांची पालखी जाते. या पालखीसोबत लाखो वारकरी अंदाजे १५० किमी अंतर पायी चालत पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी जातात.
HANUMAN WADI KEJGAON

सं त श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी 